Close

पनीर मालपोहा (Paneer Malpoha)

पनीर मालपोहा

साहित्य : 100 ग्रॅम पनीर, 3 टेबलस्पून मावा, 8 टीस्पून दूध, 1 टीस्पून पिठीसाखर, पाव टीस्पून वेलची पूड, 2 टेबलस्पून मैदा, 1 कप तूप, थोडे बदाम-पिस्त्याचे काप.

पाक तयार करण्यासाठी : 1 कप पाणी, 1 कप साखर, थोडा केशर, पाव टीस्पून वेलची पूड.
कृती ः मिक्सरमध्ये पनीर, मावा आणि 4 टीस्पून दूध घालून दाट मिश्रण तयार करा. त्यात पिठीसाखर, मैदा, वेलची पूड आणि उर्वरित दूध घालून व्यवस्थित फेटून घ्या. आता कढईमध्ये तूप गरम करत ठेवा. गरम तुपात पनीरचं 1 टेबलस्पून मिश्रण घालून दोन्ही बाजूने मंद आचेवर सोनेरी रंगाचा होईपर्यंत तळून घ्या.

पाक तयार करण्यासाठी : एका पॅनमध्ये पाणी आणि साखर घालून उकळत ठेवा. त्यात केशर आणि वेलची पूड घालून दाट होईपर्यंत उकळवा. पाक तयार झाला की, त्यात मालपोहे घालून, दहा-पंधरा मिनिटं बुडवून ठेवा. नंतर हे मालपोहे सर्व्हिंग डिशमध्ये ठेवून त्यावर बदाम-पिस्त्याचे काप पसरवा आणि सर्व्ह करा.

Share this article