पंजाबी आलू पराठा
साहित्य: अर्धा किलो उकडलेले बटाटे, 2 वाट्या गव्हाचे पीठ, अर्धा कप मैदा, 2 चमचे तेल, 2 बारीक चिरलेले कांदे, 1 जुडी बारीक चिरलेली कोथिंबीर, आधा टीस्पून लाल मिरची पावडर, 1/4 टीस्पून हळद, 2 बारीक चिरलेल्या हिरव्या मिरच्या, 2 चमचे तूप, चवीनुसार मीठ.
कृती : गव्हाचे पीठ, मैदा, तेल आणि मीठ एकत्र मळून घ्या. बटाटे मॅश करून त्यात बारीक चिरलेला कांदा, कोथिंबीर, मीठ, लाल तिखट, हळद, बारीक चिरलेल्या हिरव्या मिरच्या घालून मिक्स करा. पीठाच्या गोळ्यात बटाट्याचे सारण भरून आणि पराठा लाटून घ्या आणि तूप लावून कुरकुरीत भाजून घ्या.
Link Copied