शेंगदाण्याची आमटी
साहित्य : अर्धा कप भाजलेले शेंगदाणे, 2 कप पाणी, 1 टीस्पून तूप, अर्धा टीस्पून जिरं, 2 आमसुलं, 2-3 हिरव्या मिरच्या, 1 टीस्पून किसलेला गूळ, स्वादानुसार मीठ, थोडी बारीक चिरलेली कोथिंबीर.
कृती : शेंगदाण्याची सालं काढून जाडसर कुटून घ्या. आता शेंगदाण्याचा कूट आणि पाणी मिक्सरमध्ये एकत्र फिरवा.
शेंगदाणे पूर्णतः वाटायला हवेत. आता एका जाड बुडाच्या पातेल्यात तूप गरम करून त्यात जिरं आणि हिरव्या मिरचीच्या तुकड्यांची फोडणी करा. त्यात शेंगदाण्याचं मिश्रण घालून एक उकळी काढा. आता त्यात आमसुलं, मीठ आणि साखर घालून चांगली उकळी काढा. शेंगदाण्याची आमटी गरमागरम सर्व्ह करा.
Link Copied