साहित्य : 200 ग्रॅम बटाटा, चवीनुसार मीठ, 1 चमचा जायफळ पावडर, 1 टेबलस्पून भाजलेले बेसन, 100 ग्रॅम वाटाणे, 1 चमचा शाही जिरे, 2 हिरव्या मिरच्या, 1चमचा आले 1चिमुटभर हिंग, 1चमचा चीज, 1 लिंबाचा रस, 1 टीस्पून चाट मसाला, 1 टेबलस्पून तेल, 2 काकडी, 2कैरी, 2 टेबलस्पून कोथिंबीर, 1 टीस्पून मेथीचे दाणे, 1 टेबलस्पून चिरलेली लेट्यूसची पाने, 1 टेबलस्पून डाळिंब.
कृती: बटाटे सोलून किसून घ्या. त्यात भाजलेले बेसन, जायफळ पावडर आणि मीठ घाला. कढईत तेल गरम करून त्यात जिरे घाला ते तडतडल्यावर चिरलेले आले, हिरवी मिरची घाला. नंतर त्यात हिंगही टाका. आता त्यात हिरवे वाटाणे घालून पाणी सुटेपर्यंत परतून घ्या. भांडे आचेवरून खाली उतरवा आणि थंड होऊ द्या. आता त्यात किसलेले चीज, चाट मसाला, लिंबाचा रस आणि मीठ घाला. उकडलेल्या बटाट्याची टिक्की बनवून त्यात मटारचे मिश्रण भरा. तयार टिक्की सोनेरी तपकिरी होईपर्यंत तळा. कैरीच्या सॅलडसाठी, कैरी किसून घ्या आणि त्यात चिरलेली कोथिंबीर, लिंबाचा रस, तिखट, चाट मसाला आणि मीठ घाला. काकडी न सोलता शक्य तितकी पातळ कापून घ्या. काकडीच्या कापांचे4 तुकडे एकमेकांवर ठेवून त्याला वाटीचा आकार द्या. त्यात सॅलड ठेवा आणि मेथीचेदाणे आणि लेट्यूसच्या पानांनी सजवा. गरमागरम टिक्की सॅलडसोबत सर्व्ह करा.
बटाट्याची टिक्की आणि कच्च्या कैरीचे सॅलड (Potato Tikki And Raw Mango Salad 1)
Link Copied