रगडा कचोरी चाट
साहित्यः सारणासाठी: पाऊण कप पांढरे वाटाणे, 1 टेबलस्पून तेल, अर्धा टीस्पून बडीशेप, अर्धा टीस्पून हळद, 1 टीस्पून लाल तिखट, 1 टीस्पून धणेपूड, अर्धा टीस्पून जिरेपूड, 2 टेबलस्पून बारीक चिरलेली कोथिंबीर, चवीपुरते मीठ.
कव्हरसाठी: सव्वा कप मैदा, 2 टेबलस्पून गरम तूप किंवा तेल, अधार्र् टीस्पून मीठ.
इतर साहित्यः अधार्र् कप चिंचगुळाची चटणी, पाव कप हिरवी तिखट चटणी, पाऊण कप दही+2 टीस्पून साखर+ अर्धा टीस्पून मीठ, अधार्र् कप बारीक शेव, 2 ते3 टेबलस्पून बारीक चिरलेली कोथिंबीर, 2 टीस्पून चाट मसाला, थोडेसे लाल तिखट, कचोर्या तळायला तेल.
कृती: वाटाणे रात्रभर भिजवावेत. भिजवलेले वाटाणे कुकरमध्ये मऊसर शिजवून घ्यावेत. नंतर मॅश करावेत. मैदा एका वाडग्यात घ्यावा. त्यात मीठ आणि गरम तूप घालून मळून घ्या. झाकण ठेवून 20 मिनिटे बाजूला ठेवावे. कढईत तेल गरम करून त्यात हळद, लाल तिखट, आणि बडीशेप घालावी. त्यात मॅश केलेले वाटाणे घालावे. त्यात धणे-जिरेपूड घालावे. मिक्स करून 3-4 मिनिटे झाकण ठेवून मंद आचेवर वाफ काढावी. मिश्रण सुकेस्तोवर परतावे. आच बंद करावी. भिजवलेल्या मैद्याचे 6 ते 8 समान भाग करावे. मैद्याचा एक भाग घेऊन लाटावा. मध्यभागी 1 चमचा सारण ठेवावे. पारीच्या बाजू एकवटून बंद करावे. थोडा कोरडा मैदा घेऊन जाडसर लाटावे. कढईत तळण्यासाठी तेल गरम करावे. कचोरी तेलात सोडून लालसर रंगावर तळून घ्यावी. तळलेली कचोरी प्लेटमध्ये काढून वरच्या बाजूला लहानसे भोक पाडावे. आत चिंचेची चटणी, हिरवी चटणी घालावी. त्यावर दही, चाट मसाला, लाल तिखट, शेव आणि कोथिंबीर आवडीनुसार भुरभुरावे. लगेच सर्व्ह करावे.