साहित्य : 2 कैर्या, चवीनुसार पिठीसाखर, पाव टीस्पून काळी मिरी पूड, अर्धा टीस्पून मीठ. कृती : कैर्या तासून अगदी बारीक किसणीने किसून घ्या. एका पातेल्यात दोन वाटी पाणी घेऊन त्यात कैरीचा कीस घाला आणि अर्धा तास भिजत ठेवा. नंतर त्यात चवीनुसार पिठीसाखर आणि मीठ एकत्र करा. हे मिश्रण फ्रीजमध्ये थंड करत ठेवा. कैरीचं पन्हं थंडगार सर्व्ह करा.
टीप :
- कच्च्या कैरीत आंबटपणा
अधिक असल्यामुळे घशाला त्रास होऊ शकतो. तो टाळण्यासाठी मिरपूड फायदेशीर. - हे सरबत गाळूनही घेता येईल.
- कैरी किसण्याऐवजी त्याचे तुकडे करून मिक्सरमधून बारीक वाटूनही घेता येतील.
- हे पन्हं फार काळ टिकत नाही.
Link Copied