साहित्य: 1 टीस्पून जिरे, 1 चिमूट हिंग, 2 टीस्पून तीळ, 5 हिरव्या मिरच्या (मध्यभागी चिरलेल्या), 250 ग्रॅम फ्लोवर, 250 ग्रॅम बटाटे, 1 टीस्पून हळद , 1 टीस्पून लाल तिखट, 1 मोठा टोमॅटो (मोठे तुकडे करा), आवश्यकतेनुसार तेल.
कृती : एका कढईत तेल गरम करून त्यात हिंग व जिरे टाका, नंतर तीळ, हिरव्या मिरच्या आणि भाज्या घालून 2 मिनिटे परतून घ्या. मसाले टाकून झाकून ठेवा आणि मंद आचेवर शिजू द्या.भाजी शिजल्यावर टोमॅटो घाला आणि एक मिनिट शिजवा. तीळवाले आलू-गोभी तयार आहेत, कोथिंबिरीने सजवा आणि पराठ्यांसोबत गरमागरम सर्व्ह करा.
Link Copied