तांदळाची खीर
साहित्य : 1 वाटी तांदळाचा रवा (कणी), 3 वाटी दूध, 1 वाटी साखर, 1 वाटी नारळाचा चव, 1 चमचा तूप, स्वादानुसार वेलची पूड.
कृती : जाड बुडाच्या पातेल्यामध्ये तूप घालून त्यात रवा चांगला भाजून घ्या. नंतर त्यात उकळते दूध घालून रवा मऊसर शिजवून घ्या. रवा शिजल्यानंतर त्यात साखर घालून एकजीव करा. नंतर त्यात नारळाचा चव आणि वेलची पूड घालून व्यवस्थित एकत्र करा.
टीप : रवा शिजण्यापूर्वी साखर मुळीच घालू नये.
दुधीची खीर
साहित्य : 2 किसलेला दुधी, 5 वाटी गरम दूध, चिमूटभर खायचा सोडा, अर्धा वाटी साखर, 1 चमचा तूप, स्वादानुसार वेलची पूड.
कृती : जाड बुडाच्या पातेल्यात तूप घालून त्यात दुधीचा कीस परतवून घ्या. नंतर त्यात दूध घालून, लगेच चिमूटभर खायचा सोडा घाला. यामुळे दूध फाटत नाही. नंतर आवडीनुसार दूध आटवून घ्या. त्यात साखर घालून व्यवस्थित एकत्र करा. नंतर त्यात चारोळी घालून खीर विस्तवावरून खाली उतरवा.
टीप :
दूध व साखरेचे प्रमाण आवडीनुसार बदलता येईल.
याच प्रकारे बिटाची खीरही करता येते.