सैफ अली खानचा मुलगा इब्राहिम अली खान आणि टीव्ही अभिनेत्री श्वेता तिवारीची मुलगी पलक तिवारी यांच्या अफेअरची चर्चा अनेक दिवसांपासून सोशल मीडियावर होत आहे. पण यात किती तथ्य आहे माहीत नाही. अलीकडेच पलक तिवारी आणि इब्राहिम अली खान यांनी मुंबईत करण मेहताच्या वाढदिवसाच्या पार्टीला एकत्र हजेरी लावली होती. दोघेही ब्लॅक आउटफिटमध्ये ट्विनिंग करताना दिसले.
सुपरस्टार सलमान खानच्या 'किसी का भाई किसी की जान' या चित्रपटातून अभिनय क्षेत्रात पदार्पण करणारी पलक तिवारी नुकतीच मुंबईत वाढदिवसाच्या पार्टीत दिसली. बॉलिवूडमध्ये येण्यापूर्वी पलक तिवारी आणि सैफ अली खानचा मुलगा इब्राहिम अली खान यांच्या अफेअरच्या अफवा सोशल मीडियावर व्हायरल झाल्या होत्या.
काल अभिनेता करण मेहताचा वाढदिवस होता. त्यानिमित्त अभिनेत्याने त्याच्या जवळच्या मित्रांसाठी पार्टी आयोजित केली होती. या वाढदिवसाच्या पार्टीत पलक तिवारी, इब्राहिम अली खान, आलिया कश्यप आणि तिचा बॉयफ्रेंड शेन ग्रेगोयर आणि अलाया एफ यांनी हजेरी लावली होती. पण सर्वांच्या नजरा पलक आणि इब्राहिमवर खिळल्या.
दोघांनी एकत्र पार्टीत प्रवेश केल्याचे व्हिडिओ सोशल मीडियावर व्हायरल होत आहेत. अर्थात पलकने याआधी इब्राहिमसोबतच्या तिच्या अफेअरच्या बातम्या फेटाळून लावल्या होत्या, मात्र आता दोघांना पुन्हा एकत्र पाहिल्याने त्यांचे नाते पुन्हा एकदा चर्चेत आले आहे.
पार्टीदरम्यान पलक काळ्या रंगाच्या ड्रेसमध्ये दिसली.पार्टी स्थळी प्रवेश करताना दोघांनी हातमिळवत एकमेकांचे स्वागत केले. पार्टीत इब्राहिम काळ्या शर्ट आणि ग्रे डेनिममध्ये होता. पार्टीला जाताना इब्राहिम पापाराझींना पोजही देऊन गेला.