सध्या क्रिडा विश्वात सानिया मिर्झा आणि पाकिस्तान क्रिकेटर शोएब मलिक यांच्या घटस्फोटामुळे धुमाकूळ घातला आहे. शोएब मलिक आणि सानिया मिर्झाच्या घटस्फोटाच्या चर्चा गेले काही महिने सोशल मीडियावर सुरुच होत्या पण काही दिवसांपूर्वी शोएबने पाकिस्तानी अभिनेत्री सना जावेदसोबत लग्न करुन सर्वांनाच मोठा धक्का दिला. या लग्नाच्या काही दिवसांपूर्वीच सानियाने एक गुढ पोस्ट शेअर केली होती. शोएबचे हे तिसरे लग्न आहे.
आता पुन्हा एकदा सानियाने एक पोस्ट शेअर करत त्याला लाइफलाईन असं कॅप्शन दिले आहे. हा मुलांसोबतचा फोटो आहे. या फोटोंवर तिचे चाहतेही कमेंट करत आहेत.
काही दिवसांपूर्वी पाकिस्तानी पत्रकाराने सानियाशी झालेला संवाद शेअर केला. त्यात त्याने सांगितले की, सानियाचा घटस्फोट आणि शोएब मलिकच्या तिसऱ्या लग्नानंतर तिचा 5 वर्षांचा मुलगा इजहान मिर्झा मलिकला याचा फटका बसल्याचे दिसत आहे. पत्रकाराच्या म्हणण्यानुसार, इजहानचा त्याच्या शाळेत इतका छळ केला जात आहे की त्याने शाळेत जाणे बंद केले आहे.
सानियाने तिचा मुलगा इजहानच्या मानसिक आरोग्याबद्दल चिंता व्यक्त केली आणि त्याच्या वडिलांच्या तिसऱ्या लग्नाशी संबंधित बातम्या त्याला मानसिकदृष्ट्या त्रास देत असल्याचे उघड केले.
शोएब मलिकचे हे तिसरे लग्न आहे. त्याचे पहिले लग्न आयेशा सिद्दीकीशी झालेले. त्यानंतर २०१० मध्ये त्याने सानिया मिर्झाशी लग्न केले.