साऊथचे स्टार कपल राम चरण आणि उपासना यांच्या घरात आनंदाचे वातावरण आहे. उपासना हिने एका मुलीला जन्म दिला आहे. सोमवारी उपासनाला हैदराबादच्या अपोलो रुग्णालयात दाखल करण्यात आले, त्यानंतर 20 जून रोजी मुलीचा जन्म झाला. यापूर्वी, राम आणि त्यांच्या पत्नीचा हॉस्पिटलमधील एक व्हिडिओ समोर आला होता, त्यानंतर काही तासांनी ही बातमी आली आहे. लग्नाच्या 11 वर्षानंतर राम चरण आणि उपासना आई-वडील झाले आहेत.
राम चरण आणि उपासना कामिनेनी यांच्या बाळाची बातमी हैदराबादच्या अपोलो हॉस्पिटलने शेअर केली. हॉस्पिटलने मेडिकल बुलेटिन शेअर करत म्हटले आहे की, 'श्रीमती उपासना कामिनेनी कोनिडेला आणि राम चरण यांना 20 जून 2023 रोजी अपोलो हॉस्पिटल ज्युबली हिल्स, हैदराबाद येथे मुलगी झाली. बाळ आणि आई निरोगी दोघेही आहेत.
चिरंजीवी यांनी जाहीर केले होते
राम चरणचे वडील मेगास्टार चिरंजीवी यांनी राम आणि उपासना लवकरच आईबाबा होणार असल्याची घोषणा केली होती. या ज्येष्ठ अभिनेत्याने ट्विटरवर लिहिले की, 'श्री हनुमानजींच्या आशीर्वादाने, उपासना आणि राम चरण त्यांच्या पहिल्या अपत्याची अपेक्षा करत असल्याची घोषणा करताना आम्हाला आनंद होत आहे. प्रेम आणि कृतज्ञता, सुरेखा आणि चिरंजीवी कोनिडेला. शोभना आणि अनिल कामिनेनी.
रामने या वर्षाच्या सुरुवातीला एका मुलाखतीदरम्यान या मुलगी होणार असल्याचे संकेत दिले होते.