Close

निरोगी जीवनशैलीकडे नेणारे मसाले (Spices Can Take You To Healthy Lifestyle)

वजन कमी करण्यासाठी, आरोग्य राखण्यासाठी अलिकडे जे काही उपाय सांगितले जातात, त्यापैकी एक असतो की, मसालेदार पदार्थांचे सेवन टाळा. पण खरं म्हणजे आपण जे मसाले वापरतो, त्याच्याने आरोग्य बिघडत नाही, तर चांगले राहते. कसे ते पाहूया.

चांगल्या आरोग्यासाठी आहार परिपूर्ण असला पाहिजे. अन्‌ या परिपूर्ण आहाराचा अर्थ पदार्थ चविष्ट असावेत असा आहे. त्यासाठी आवश्यक त्या मसाल्यांचा समावेश केलेला असावा. म्हणजेच चांगल्या आरोग्यासाठी मसाल्यांच्या बाबतीत तडजोड करण्याऐवजी जेवणामध्ये त्यांचा समावेश करणे नक्कीच फायदेशीर ठरेल; असे मत टाटा संपन्नच्या पोषण सल्लागार कविता देवगण यांनी व्यक्त केले आहे. त्या पुढे म्हणतात, "वैद्यकशास्त्राचे प्राचीन भारतीय ज्ञान ज्यामध्ये सामावले आहे, अशा आयुर्वेदामध्ये विविध व्याधी टाळण्यासाठी व बऱ्या करण्यासाठी उपाय म्हणून मसाल्यांचे महत्त्व सांगितले गेले आहे. मसाल्यांमुळे आपल्या आहारात अत्यावश्यक सूक्ष्म पोषक घटकांचा समावेश होतो, ज्यामुळे आपण आजारांना दूर ठेवू शकतो."

त्यांनी पुढे असेही सांगितले आहे की, हे मसाले आपल्या आजूबाजूला सहज उपलब्ध असतात. उदाहरणार्थ - गरम मसाला. सर्व अख्खे मसाले एकत्र करून, त्यांची पूड करून तयार केलेला गरम मसाला आपण नियमित वापरतो. तो पचनास मदत करण्यापासून ते दाह दूर करण्यापर्यंत गुणकारी असतो. शरीराची रोगप्रतिकारक क्षमता दूर राखतो.

हळद : हिच्यात असलेल्या घटकांमुळे  दाह, जळजळ रोखणाऱ्या व सूक्ष्मजीव विरोधी क्षमता असतात.

जिरे : जिऱ्यामध्ये मुबलक प्रमाणात लोह असते, जे लाल रक्तपेशी व शरीराच्या विविध भागांना प्राणवायू पोहोचवणारे हिमोग्लोबिन निर्माण करण्यासाठी आवश्यक असते शिवाय पचनसंस्थेसाठी गुणकारी असते.

लवंग : लवंगामध्ये कफ दूर करण्याची सेंद्रिय क्षमता असते. ती घशातील कफ व अन्नलिका साफ करण्यास मदत करते.

ओवा : सर्दीवर उपचार म्हणून तसेच नाकातील अवरोध दूर करण्यात ओवा गुणकारी आहे. कसुरी मेथी : हिच्यात भरपूर प्रमाणात फायबर असते. ती शरीरातील कोलेस्टेरॉल व दाह दूर करते. तसेच पचनक्रियेत मदत करते. रक्तातील साखर नियंत्रणात ठेवते.

धणे पूड : पोटफुगी दूर करण्यात व पचन प्रक्रियेत मदत करण्यात हा उत्कृष्ट मसाला आहे आतड्याचे आरोग्य चांगले राहावे, सर्दीच्या विषाणूपासून रक्षण व्हावे, यासाठी धणे पूड गुणकारी ठरते.

Share this article