पालक आणि बटाट्याचे सूप
साहित्य : 3-4 बटाटे सोलून चिरलेले, 1 कांदा बारीक चिरलेला, 3 पाकळ्या लसूण पेस्ट, 1 टेबलस्पून बटर, 4 कप व्हेजिटेबल स्टॉक, 1 टेबलस्पून कॉर्नफ्लोअर, 1 कप दूध, 1 वाटी चिरलेला पालक, चवीनुसार मीठ आणि मिरपूड.
कृती : एका फ्राईंग पॅनमध्ये बटर गरम करून त्यात बटाटे, कांदे आणि लसूण पेस्ट घालून परतून घ्या. भाज्यांचा स्टॉक घालून बटाटे शिजेपर्यंत शिजवा. आता ते थंड होऊ द्या आणि ब्लेंड करून सूप बनवा. ते पुन्हा फ्राईंग पॅनमध्ये उकळवा. कॉर्नफ्लोअर आणि थंड दूध एकत्र करून चांगले ढवळत शिजवा. एक उकळी आल्यावर पालक घाला. मीठ आणि मिरपूड घाला. 2-3 मिनिटे उकळवा आणि गरम सर्व्ह करा.
पालक आणि बटाट्याचे सूप (Spinach And Potato Soup)
Link Copied