Close

रताळ्याची बर्फी (Sweet Potato Burfi)

रताळ्याची बर्फी

साहित्य : 2 उकडलेली रताळी (मध्यम आकाराची), 1 वाटी किसलेले खोबरे, 4 टीस्पून शेंगदाण्याचा कूट, 4-5 टीस्पून तूप, 1 वाटी साखर, वेलची पूड.
कृती : मंद आचेवर कढई गरम करून यात साखर व थोडे पाणी टाका. सतत हलवत रहा. साखर विरघळून त्याला तांबूस रंग येईपर्यंत हलवत रहा. आता यात थोडं तूप घाला व नंतर इतर साहित्य घाला. मंद आचेवर 3-4 मिनिटे परतत रहा. मिश्रणाचा तांबूस रंगाचा घट्ट गोळा तयार झाल्यावर एका थाळीला तूप लावून, हा गोळा या थाळीत पसरवा. थंड झाल्यावर याच्या वड्या पाडा. किसलेले खोबरे ठेवून सजवा आणि सर्व्ह करा.
टिप : सर्व साहित्य कढईत टाकल्यावर सारखे हलवत रहा.

Share this article