रताळ्याचे मोदक
पारीसाठी साहित्य : अर्धा किलो रताळी, 1 वाटी नारळाचा चव, 4 मोठे चमचे साखर, वेलची पूड, अर्धी वाटी साबुदाण्याचे पीठ, चवीपुरते मीठ.
सारणासाठी साहित्य : रताळी उकडून सोलून घ्या. त्यात साबुदाण्याचे पीठ घालून मिश्रण एकजीव करून घ्या. आता कढईत तूप गरम करून नारळाचा चव, साखर आणि वेलची पूड मिसळा. सारण तयार करा. रताळ्याच्या मिश्रणाचे छोटे छोटे गोळे करून पारी तयार करा. यात सारण भरून मोदक तयार करून घ्या. हे मोदक तळायचे अथवा उकडवायचे नाहीत. तसेच हे मोदक उपवासालाही चालतात.
पुरणाचे मोदक
पारीसाठी साहित्य : नेहमीप्रमाणे तांदळाच्या उकडीच्या मोदकाचे साहित्य घ्या.
सारणासाठी साहित्य : पाव किलो चणा डाळ, पाव किलो बारीक चिरलेला गूळ, वेलची-जायफळ पूड, थोडेसे केशर, तूप.
कृती : चण्याची डाळ मऊ शिजवा. डाळ शिजल्यावर यातील पाणी निथळून यात गूळ मिसळा. आच कमी करून गूळ आणि चणा डाळ घोटून घ्या. गूळ विरघळू लागला की, यात तूप आणि वेलची पूड टाका. चांगले परतल्यानंतर केशर दुधात भिजवून मिश्रणावर हबका मारत रहा. नंतर हे मिश्रण पुरणयंत्रातून वाटून घ्या. नेहमीप्रमाणे तांदळाची उकड काढून बारीक गोळे करा. या गोळ्यची पारी तयार करून यात पुरणाचे सारण भरा. छानशा चुण्या पाडून मोदक तयार करा. हे मोदक मिश्रण न वाटता केल्यासही कडबुप्रमाणे चविष्ट लागतात.