बॉलिवूडमध्ये अशी अनेक सेलिब्रिटी जोडपी आहेत ज्यांच्यावर चाहते खूप प्रेम करतात, त्यांना पाहण्यासाठी आतुर असतात. ग्लॅमर इंडस्ट्रीतील सर्व जोडप्यांमध्ये सिद्धार्थ मल्होत्रा आणि कियारा अडवाणी हे सर्वात क्यूट कपल मानले जाते. या वर्षी फेब्रुवारी महिन्यात राजस्थानमध्ये सिद्धार्थ आणि कियाराने लग्न केले. लग्नाआधी त्यांनी आपलं नातं सगळ्यांपासून लपवून ठेवण्याचा पुरेपूर प्रयत्न केला असला तरी आता कियारा अडवाणीने हा निर्णय का घेतला याचा खुलासा करत त्यामागचं कारण सांगितलं आहे.
कियारा अडवाणी आणि सिद्धार्थ मल्होत्रा यांनी लग्नाआधी बराच काळ एकमेकांना गुपचूप डेट केले, पण लग्न होईपर्यंत त्यांनी आपले नाते गुपित ठेवले, त्यानंतर दोघांनी एकत्र येण्याचा निर्णय घेतला आणि ७ फेब्रुवारीला सूर्यगढ पॅलेसमध्ये त्यांचा भव्य विवाह पार पडला.
आपले वैयक्तिक आयुष्य खाजगी ठेवणारी कियारा अडवाणीने नुकत्याच दिलेल्या एका मुलाखतीत सांगितले की, लग्नाआधी आम्हा दोघांनाही आमचे नाते जपायचे होते, कारण सिद्धार्थ आणि मी दोघेही स्वनिर्मित कलाकार आहोत. इंडस्ट्रीत आमचे स्थान निर्माण करण्यासाठी आम्ही खूप मेहनत केली आहे, त्यामुळे आमचे लक्ष केवळ वैयक्तिक आयुष्यावर केंद्रित होऊ नये आणि इंडस्ट्रीत आम्ही जे कष्ट घेतले ते वाया जाऊ नये असे आम्हाला वाटत होते.
अभिनेत्री पुढे म्हणाली की, तिचं आणि सिद्धार्थचं मिलन खरंच खूप सुंदर आहे, जे त्यांना लग्नाआधीही सगळ्यांसोबत शेअर करायचं होतं, पण पब्लिक फिगर असल्याने ते दोघेही त्यांच्या कामापासून दूर जाऊ शकत नव्हते आणि दुर्लक्ष करू शकत नाहीत. अभिनेत्रीने सांगितले की, आम्ही प्रथम कलाकार आहोत आणि यासाठीच आम्ही ओळखले जातो, म्हणून आम्ही आमचे वैयक्तिक आयुष्य लग्नापर्यंत गुप्त ठेवण्याचा निर्णय घेतला.
यापूर्वी एका मुलाखतीत कियाराने सांगितले होते की, तिचा पती सिद्धार्थ मल्होत्रा हा खासगी व्यक्ती आहे आणि लग्नाशी संबंधित गोष्टी पोस्ट केल्या जाव्यात असे त्याला अजिबात वाटत नव्हते, तरीही त्याने लग्नाशी संबंधित फोटो सोशल मीडियावर पोस्ट केले होते. कियाराने असेही सांगितले की लग्नाचा व्हिडिओ पोस्ट करण्यावरून तिच्या आणि सिद्धार्थमध्ये बराच वाद झाला होता.
कियारा अडवाणी शेवटची कार्तिक आर्यनसोबत 'सत्यप्रेम की कथा' या चित्रपटात दिसली होती, आता ती लवकरच साऊथ सुपरस्टार राम चरणसोबत 'गेम चेंजर' चित्रपटात दिसणार आहे. यासोबतच ती हृतिक रोशन आणि ज्युनियर एनटीआरसोबत 'वॉर 2' मध्ये दिसणार असल्याची बातमी आहे. सिद्धार्थ मल्होत्राचा ‘योधा’ हा चित्रपट ८ डिसेंबरला चित्रपटगृहात प्रदर्शित होत आहे.