Close

ज्यूस प्या, पोट आवळा (These Juices Can Give You Flat Tummy)

व्यायामाच्या जोडीला काही ज्यूसेस प्यायल्याने पोटाचा आकार बदलू शकतो. दररोज रात्री हे काही ज्यूसेस पिऊन पोटाचा घेर कमी करता येईल.

हल्लीच्या युगात कामाचा तणाव जास्त असला तरीही हे कामकाज एका जागी बसून करण्याची गरज निर्माण झाली आहे. कारण डिजिटल युगात तसं करावंच लागतं. गृहिणींच्या दिमतीलाही वॉशिंग मशीन, डिश वॉशर, व्हॅक्युम क्लीनर सारखी उपकरणं हात जोडून उभी असल्याने तिचीही अंगमेहनत कमी झाली आहे. परिणामी, पोट सुटण्याची ‘फॅशन’ आली आहे. ही फॅशन मात्र नकोशी आहे. सपाट पोट असावं, असं प्रत्येक स्त्रीला वाटतं. त्यासाठी व्यायाम आवश्यक असला तरी त्याच्या जोडीला काही ज्यूसेस प्यायल्याने पोटाचा आकार बदलू शकतो. दररोज रात्री हे काही ज्यूसेस पिऊन पोटाचा घेर कमी करता येईल.

काकडी
काकडीमध्ये अत्यंत कमी कॅलरीज असतात. तेव्हा तिचा रस पोटाचा घेर कमी करण्यास चांगलाच फायदेशीर ठरतो. या रसाने पोट साफ होतं, शिवाय पोटापाशी चरबी साठत नाही. मात्र ज्या कुणाला काकडीच्या रसाने त्रास होत असेल, त्याने हा रस पिऊ नये. इतर ज्यूस आहेतच.

लिंबू
शरीराला नुकसान करणारे सर्व टॉक्सिन्स बाहेर काढण्याची क्षमता लिंबामध्ये आहे. त्यामुळे लिंबू पाणी पिणं फारच फायद्याचं ठरतं. लिंबू पाण्याने शरीरात ऊर्जा आणि ताजगी येते.

आलं
आल्याचा रस जिभेला झोंबतो, तिखट लागतो. त्यामुळे हा रस फक्त एक चमचा प्यावा. शरीरात जमलेल्या चरबीला जाळण्याची क्षमता आल्यामध्ये आहे. आल्याचा रस फॅट्स आणि कॅलरीज जाळून काढतो.
अ‍ॅलोव्हेरा अर्थात कोरफडीचा रस वजन घटवण्यासाठी कारणीभूत ठरतो. दररोज झोपण्यापूर्वी एक कप हा रस प्यावा. त्यामुळे पोटाची चरबी कमी होते. सपाट पोटासाठी उत्तम असा हा अ‍ॅलोव्हेरा ज्यूस आहे. हा रस चेहर्‍यावर लावल्यास डागही जातात.

सुपर ज्यूस
1 काकडी, 1 जुडी पार्सले किंवा कोथिंबीर, 1 लिंबू, 1 चमचा किसलेलं आलं आणि 1 टीस्पून अ‍ॅलोव्हेरा ज्यूस यांचं एकजीव मिश्रण तयार करा. त्यात अर्धा कप पाणी मिसळा. अन् हे मिश्रण दररोज रात्री झोपण्यापूर्वी प्या. पोटातली चरबी कमी होईल. कोथिंबीर आणि पार्सलेमध्ये अगदी कमी कॅलरीज असतात. शिवाय त्यात अँटी-ऑक्सिडंट्सही भरपूर प्रमाणात असतात. तेव्हा त्यांचं सेवन पोट सपाट करण्यासाठी उपयुक्त ठरतं.

Share this article