Close

टोमॅटो पकोडा (Tomato Pakoda)

टोमॅटो पकोडा


साहित्य : 2 टोमॅटो, 100 ग्रॅम बेसन, चिमूटभर सोडा, 1 टीस्पून लाल मिरची पूड, अर्धा टीस्पून ओवा, 1 टीस्पून चाट मसाला, चवीनुसार मीठ, तळण्यासाठी तेल.

कृती : टोमॅटोचे मोठे मोठे गोल काप करून त्यावर मीठ लावा. बेसन, लाल मिरची पूड, चाट मसाला, मीठ, सोडा व ओवा एकत्र करून घट्टसर मिश्रण तयार करून घ्या. टोमॅटोचे काप बेसनाच्या मिश्रणात बुडवून सोनेरी रंगावर तळून घ्या. टोमॅटो पकोडा हिरवी चटणी वा सॉससह सर्व्ह करा.

Share this article