सध्या सोशल मीडियावर बॉलिवूडचा खिलाडी अक्षय कुमार आणि त्याची पत्नी ट्विंकल खन्नाचा एक व्हिडिओ व्हायरल होत आहे. अक्षय आणि ट्विंकल यांचा प्रेमविवाह झाला होता. दोघेही अनेकदा आपल्या सोशल मीडियावरुन एकमेंकासोबतचे खास व्हिडिओ शेअर करत असतात. आता त्यांचा एक व्हिडिओ चर्चेत आहे.
ट्विंकल खन्ना ही अभिनेत्री म्हणून जितकी लोकप्रिय झाली नाही तितकी ती एक लेखिका म्हणून झाली. तिची अनेक पुस्तके लोकप्रिय आहेत. तिचे आणखी एक नवे पुस्तक नुकतेच लॉन्च झाले. ज्याचा व्हिडिओ सध्या व्हायरल होत आहे.
हा व्हिडिओ ट्विंकल खन्नाच्या नुकत्याच लाँच झालेल्या पुस्तकाच्या साइनिंग इव्हेंटचा आहे. या कार्यक्रमात अक्षय कुमार त्याच्या बायकोकडे पुस्तकावर स्वाक्षरी घेण्यासाठी जाताना दिसतो. तो ट्विंकलकडे जातो आणि तिला पुस्तकावर ऑटोग्राफ करायला सांगतो. यावर ट्विंकल खन्नाने त्याला पुस्तकावर ऑटोग्राफ देण्यास नकार दिला आणि वाट पाहण्यास सांगितले. ती स्पष्टपणे सांगते की ती आधी उभ्या असलेल्या लोकांच्या पुस्तकांवर स्वाक्षरी करेल आणि त्यानंतर तुझ्या. यावर अक्षय कुमार मागे वळून म्हणातो की मी थांबतो आणि नंतर येतो. दोघांची ही अनोख्या स्टाइलला लोकांची खूप पसंती मिळत आहे.
अक्षय कुमार शेवटचा 'मिशन रानीगंज'मध्ये दिसला होता. या वर्षी अक्षय कुमारचे 'सेल्फी' आणि 'ओह माय गॉड 2' आणि मिशन राणीगंज हे तीन सिनेमे प्रदर्शित झाले. यातील सेल्फी पडद्यावर फार काही करू शकला नाही, पण 'OMG 2' ला चाहत्यांचे खूप प्रेम मिळाले. 'मिशन राणीगंज'बद्दल बोलताना, या चित्रपटातील अक्षय कुमारचे काम समीक्षकांना आवडले. या चित्रपटाने बॉक्स ऑफिसवर फारशी कमाई केली नाही, मात्र चित्रपटाच्या कथेचे खूप कौतुक झाले.