Close

उपमा पेसारट्टू डोसा (Upma Pesarattu Dosa)

उपमा पेसारट्टू डोसा

साहित्य : पेसारट्टू डोशाचे पीठ, आवश्यकतेनुसार तेल वा तूप.
उपम्याकरिता : 1 कप भाजलेला रवा, 1 टीस्पून जिरे,  थोडी कढीपत्त्याची पाने, 1 टेबलस्पून तेल, स्वादानुसार मीठ.
कृती : एका पॅनमध्ये तेल गरम करून त्यात जिरे व कढीपत्त्याची फोडणी करून घ्या. त्यात 4 कप पाणी घालून उकळी येऊ द्या. नंतर त्यात मीठ व रवा घालून सतत ढवळत राहा. 5 मिनिटांनंतर आचेवरून उतरवा.
डोशाकरिता : नॉनस्टिक तवा गरम करून, त्यास तेल लावून त्यावर डोशाचे पीठ पसरवा. कडेने तेल वा तूप सोडा. नंतर डोशावर उपमा व्यवस्थित पसरवून डोसा कुरकुरीत झाल्यावर आचेवरून काढा. उपमा पेसारट्टू डोसा खोबर्‍याची चटणी व सांबारसोबत सर्व्ह करा.
टीप्स्
डोसा किंवा इडली हलकी होण्यासाठी उडीद डाळीसोबत थोडे पोहे भिजवा.
डोसा किंवा इडलीचे पीठ शिल्लक राहिल्यास ते आंबट होऊ नये  म्हणून त्यात 2-3 हिरव्या मिरच्या घालून ठेवा.
 डोसा कुरकुरीत व पातळ होण्यासाठी पीठ बारीक वाटा आणि ते चांगले आंबेल याची काळजी घ्या.
 डोसा पातळ करण्यासाठी, तव्यावर पीठ घातल्यानंतर त्यावर थोडी दाबून वाटी फिरवा.
थंडीच्या दिवसात पीठ आंबवण्यासाठी वेळ लागतो. अशा वेळी गरम पाण्यात पिठाचे भांडे ठेवा.

Share this article