व्हेज बुलेट
साहित्य : 1 उकडलेला बटाटा, उकडलेली मिक्स भाजी (फ्लोवर, कोबी, फरसबी इ.), 2 स्लाईस ब्रेड, 1 टीस्पून कॉर्नफ्लोअर, हिरवी मिरची बारीक चिरलेला, थोडे तीळ, चवीनुसार मीठ आणि काळी मिरी पावडर, तळण्यासाठी तेल
कृती : बटाटे भाज्यांमध्ये मॅश करून मिक्स करा. त्यात मिरची, मीठ, काळी मिरी पावडर, कॉर्नफ्लोअर घाला. ब्रेडचे दोन तुकडे करा आणि थोडेसे पाणी टाकून ते ओलसर करा. आता त्यात भाज्यांचे मिश्रण भरून गोळ्याचा आकार द्या आणि तीळात घोळवून सोनेरी होईपर्यंत तळा.
Link Copied