Close

व्हेजिटेबल कटलेट (Vegetable cutlet)

व्हेजिटेबल कटलेट
साहित्य:
मध्यम आकाराचे बटाटे, गाजर, फरसबी, हिरवे वाटाणे, हिरवी मिरची आणि बारीक चिरलेले आले, लिंबाचा रस, काळे मीठ, लाल तिखट, हळद, धने पावडर, बारीक चिरलेली ब्रेड, तळण्यासाठी तेल.
कृती : बटाटे उकडून, सोलून मॅश करा. गाजर, फरसबी आणि मटार उकडा. कढईत तेल गरम करून त्यात उकडलेले बटाटे, गाजर, फरसबी आणि वाटाणे, आले, हिरवी मिरची टाकून 3-4 मिनिटे शिजवा. त्यात सर्व मसाले, कोथिंबीर, लिंबाचा रस घालून मिक्स करून गॅसवरून उतरवा, मसाला थंड झाल्यावर पाण्यात भिजवलेली ब्रेड पिळून मसाल्यात मिसळा. हव्या त्या आकाराचे कटलेट बनवा आणि तेलात सोनेरी होईपर्यंत तळा.

Share this article