व्हेजिटेबल फ्रँकफर्टर
साहित्य : 100 ग्रॅम उकडून स्मॅश केलेले बटाटे, 100 ग्रॅम लाल भोपळ्याचा गर, 100 ग्रॅम चेड्डार चीज स्ट्रिप्स, 10 ग्रॅम बारीक चिरलेली लसूण, 100 ग्रॅम बारीक चिरलेला कांदा, 20 ग्रॅम
बारीक चिरलेली गाजर, 20 ग्रॅम बारीक चिरलेले बेबी कॉर्न, 20 ग्रॅम चिरलेले मशरूम, 20 ग्रॅम बारीक चिरलेली शतावरी, चिमूटभर जायफळ पूड, चिमूटभर लाल मिरची पूड, चिमूटभर काळी मिरी पूड, स्वादानुसार मीठ, 150 ग्रॅम ब्रेड क्रम्स, 30 ग्रॅम कॉर्नफ्लोअर, 30 ग्रॅम मैदा, तळण्यासाठी तेल.
कृती : तेल गरम करून त्यात लसूण आणि कांदा हलका तपकिरी होईपर्यंत परतवून घ्या. नंतर त्यात सर्व बारीक चिरलेल्या भाज्या घालून काही मिनिटं शिजवा. थोडा वेळ मुरण्यासाठी बाजूला ठेवून द्या. मिश्रण थंड झालं की, त्यात बटाटा आणि भोपळ्याचा गर आणि जायफळ पूड घाला. मिश्रण चांगलं एकजीव करा. आता चीजची एक स्ट्रिप घेऊन, त्यावर सारण पसरवा. कॉर्नफ्लोअर, मैदा आणि पाणी यांचं मिश्रण तयार करून घ्या. सर्वप्रथम या मिश्रणात व्हेजिटेबल फ्रँकफर्टर घोळा. नंतर ब्रेडक्रम्समध्ये घोळून गरम तेलात सोनेरी रंगावर तळून घ्या.