Close

व्हेजिटेबल सॅण्डविच (Vegetable Sandwich)

साहित्य : 4 सॅण्डविच ब्रेड स्लाइस, उकडलेला बटाटा, काकडी, कांदा व टोमॅटो, 1 टीस्पून चाट मसाला, 2 टीस्पून हिरवी चटणी, 2 टीस्पून बटर, अर्धा टीस्पून काळे मीठ, 2 टीस्पून टोमॅटो केचअप.
कृती : ब्रेडच्या कडा कापा. बटाटा, काकडी, कांदा आणि टोमॅटोचे पातळ गोल काप करा. ब्रेडच्या एका बाजूला बटर आणि हिरवी चटणी लावून त्यावर कांदा, टोमॅटो आणि काकडीचे काप ठेवा. चाट मसाला व मीठ भुरभुरवा. यावर बटाट्याचे काप ठेवून पुन्हा चाट मसाला व मीठ भुरभुरवा. बे्रडच्या एका बाजूला बटर व चटणी लावून तो आधीच्या ब्रेेडवर ठेवा. सॅण्डविचचे चार भाग कापून टोमॅटो सॉस टाकून सर्व्ह करा.

Share this article