साहित्य: 250 ग्रॅम उकडलेले बटाटे, 150 ग्रॅम कॉर्नफ्लोअर, 50 ग्रॅम बारीक चिरलेले गाजर , 50 ग्रॅम उकडलेले हिरवे वाटाणे, 50 ग्रॅम बारीक चिरलेला फ्लॉवर, 1 टीस्पून जिरे, 1 टीस्पून राई, 1 टीस्पून कोथिंबीर, थोडेसे कढीपत्ता, अर्धा- अर्धा चमचा लाल तिखट, बारीक चिरलेली हिरवी मिरची, अर्धा चमचा पांढरे तीळ, 1 चमचा साखर, चिमूटभर हळद, चवीनुसार मीठ तळण्यासाठी तेल. कृती : बटाटे चांगले मॅश करून त्यात कॉर्नफ्लोअर मिक्स करून लहान गोळे करून ठेवा. कढईत थोडे तेल गरम करून त्यात जिरे, मोहरी, कोथिंबीर आणि कढीपत्ता घालून सर्व बारीक चिरलेल्या भाज्या व थोडे पाणी घालून शिजवा. भाजी शिजल्यावर त्यात तिखट, आमचूर पावडर, साखर, पांढरे तीळ आणि चवीनुसार मीठ घाला. भांडे आचेवरून उतरवून थंड होऊ द्या. बटाट्याच्या गोळ्यांमध्ये भाज्यांचे मिश्रण भरून टिक्की बनवा आणि गोल्डन ब्राऊन होईपर्यंत तळा.
Link Copied