Close

बदाम मिल्क (Almond Milk)

बदाम मिल्क

साहित्य : 1 लीटर दूध, 4-5 टेबलस्पून साखर, अर्धा कप बदाम, 5 हिरवी वेलची, पाव टीस्पून केशराच्या काड्या.

कृती : कपभर कोमट पाण्यात बदाम तासभर भिजत ठेवा. नंतर बदामाची सालं काढून घ्या. बदामात थोडं दूध घालून अगदी बारीक वाटून घ्या. केशराच्या काड्या 1 टेबलस्पून कोमट दुधात भिजत ठेवा. वेलचीच्या दाण्यांची पूड करून घ्या. आता जाड बुडाच्या पातेल्यात दूध गरम करत ठेवा. दुधाला उकळी आली की, आच मंद करून त्यात बदामाचं वाटण एकत्र करा. मिश्रणात सतत ढवळत राहा. मिश्रण पाच-सहा मिनिटं मध्यम आचेवर उकळू द्या. नंतर त्यात साखर एकत्र करून पुन्हा दोन मिनिटं उकळवा आणि आच बंद करा. आता त्यात वेलची पूड आणि भिजवलेल्या केशराच्या काड्या एकत्र करा. बदाम मिल्क गरमागरम किंवा थंडगार करून सर्व्ह करा.

Share this article