पेरू पंच
साहित्य : 200 मि.ली. पेरूचा रस, 1 टीस्पून कॅप्सिको सॉस (बाजारात उपलब्ध), 1 लिंबाचा रस, पाव टीस्पून मीठ, पाव टीस्पून लाल मिरची पावडर, पाव टीस्पून मिरी पावडर, बर्फाचा चुरा, लिंबाच्या चकत्या वा फोडी
कृती : पेरूच्या रसात कॅप्सिको सॉस व लिंबाचा रस मिसळा. मीठ, मिरची पावडर व मिरी पावडर मिसळा. बर्फाचा चुरा मिसळून लिंबाच्या चकत्या लावून सजवा आणि सर्व्ह करा.
सीताफळ मिल्कशेक
साहित्य : 1 कप सीताफळाचा गर, 2 कप दूध, 1 कप व्हॅनिला आइस्क्रीम, पाव कप पिठी साखर, अर्धा टीस्पून वेलची पावडर, बर्फाचे तुकडे, सजविण्यासाठी चेरी.
कृती : सीताफळाचा गर आणि दूध एकत्र करून ब्लेण्ड करून घ्या. यात व्हॅनिला आइस्क्रीम, पिठी साखर, बर्फाचे तुकडे, वेलची पावडर टाकून पुन्हा ब्लेण्ड करून घ्या. चेरी लावून सजवा आणि सर्व्ह करा.