बटर डिलाइट
साहित्य : प्रत्येकी 100 ग्रॅम काजू व साखर, बटर स्कॉच पावडर, थोडे दूधमिश्रित केशर, चंदेरी वर्ख.
कृती : काजूची बारीक पेस्ट तयार करून घ्या. साखरेचा एक तारी पाक तयार करा. त्यात काजूची पेस्ट घालून, मिश्रणाचा गोळा तयार होईपर्यंत मंद आचेवर परतवत राहा. नंतर मिश्रण थंड होऊ द्या. थंड मिश्रणात बटर स्कॉच पावडर भरून पेढ्यासारखे गोळे तयार करा. त्यावर चंदेरी वर्ख आणि केशर व पिस्त्याचे पातळ काप लावून सजवा.
Link Copied