साहित्य : एक वाटी मैदा, 250 ग्रॅम कापलेले बोनलेस चिकन, 1 टेबलस्पून आले-लसूण पेस्ट, 1 सिमला मिरची, प्रत्येकी अर्धा कप किसून शिजवलेले गाजर व फ्लॉवर, अर्धा टीस्पून हळद, 1 टीस्पून लाल मिरची पावडर, 1 टीस्पून व्हिनेगर, 2 टेबलस्पून कापलेली कोथिंबीर, 2 टेबलस्पून लिंबाचा रस, 8 अंडी, 4 टेबलस्पून हिरवी चटणी.
कृती : मैद्यामध्ये मीठ आणि आवश्यकतेनुसार पाणी मिसळून मळून घ्या. चिकनला आलं-लसूण पेस्ट, हळद, मीठ, व्हिनेगर आणि लाल मिरची पावडर लावून ठेवा. 15 मिनिटांनी चिकन शिजवून घ्या. मैद्याची पातळ चपाती लाटा. अंड्याचे बलक एकजीव करून मीठ टाकून फेटून घ्या. तव्याला तेल लावून लाटलेली चपाती त्यावर टाका. लगेच अंड्याचे मिश्रण पसरवा. एका बाजूने चपाती चांगली भाजून अंडे लावलेल्या बाजूवर गाजर, फ्लॉवरची भाजी आणि चिकन पसरवून वरून लिंबाचा रस टाका. त्यावर चाट मसाला भुरभुरवून चपाती रोल करा. हा रोल टिश्यू पेपरमध्ये गुंडाळा आणि सॉससह गरम गरम रोल सर्व्ह करा.
चिकन फ्रँकी (Chicken Frankie)
Link Copied