Close

कॉर्न मेथी पुलाव (Corn Methi Pulao)

कॉर्न मेथी पुलाव

साहित्यः पाऊण कप बासमती तांदूळ, पाऊण कप मेथीची पाने, पाऊण कप कांदा, 2 हिरव्या मिरच्या, अर्धा कप उकडलेले मक्याचे दाणे, 1 टीस्पून किसलेले आले, 3 टेबलस्पून तेल, पाऊण कप दही, 2 तमाल पत्र, 4 लवंगा, 2 वेलची, दिड कप पाणी, चवीपुरते मीठ, 1 टेबलस्पून तूप, चिमूटभर कसूरी मेथीपूड करून घ्यावी, थोडी कोथिंबीर सजावटीसाठी.

कृती: मेथी साफ करण्यासाठी, बारीक चिरून अर्धा तास मीठाच्या पाण्यात भिजवून ठेवावी. बासमती तांदूळ धुवून, पाण्यात 20 मिनिटे भिजवून ठेवावा.
धुतलेली मेथी पाण्यातून काढून पिळून घ्यावी म्हणजे मेथीचा कडवटपणा कमी होईल. भिजवलेले तांदूळही निथळून 10 मिनिटे ठेवावे. एका खोलगट पातेल्यात तेल गरम करावे. त्यात तमालपत्र, वेलची आणि लवंगा घालून काही सेकंद परतावे. नंतर त्यात उभा चिरलेला कांदा घालून मिडीयम हाय गॅसवर 5 मिनिटे किंवा लालसर होईस्तोवर परतावे. नंतर त्यात आलं आणि हिरव्या मिरच्या घालून परतावे. आता पिळून घेतलेली मेथी घालून 2 मिनिटे परतावे. त्यात फेटलेलेे दही घालून ढवळत राहावे. दही घट्टसर झाले की त्यात उकडलेले कॉर्न घालावे. छान मिक्स करून पाणी घालावे. मीठ घालावे आणि चव पहावी. पाण्याला उकळी येऊ द्यावी. एकदा पाणी उकळू लागले की त्यात धुतलेले तांदूळ घालावे. मध्यम आचेवर, झाकण न ठेवता तांदूळ शिजू द्यावे. 60 % पर्यंत तांदूळ शिजेपर्यंत झाकण ठेवू नये. नंतर झाकण ठेवून मंद आचेवर तांदूळ पूर्ण शिजू द्यावा. फक्त गरज असेल तेव्हाच हलक्या हाताने भात ढवळावा. खूप जास्तवेळा ढवळू नये, त्यामुळे भाताची शिते तुटतात आणि भात नीट बनत नाही. भात व्यवस्थित शिजला की वरून 1 टेबलस्पून तूप घालावे आणि हलक्या हाताने सर्व्हींग प्लेटमध्ये वाढावा. फ्लेवरसाठी थोडी कसुरी मेथी भुरभुरावी. थोडी कोथिंबीर पेरून सजवावे.

Share this article

https://www.perkemi.org/ Slot Gacor Slot Gacor Slot Gacor Slot Gacor Situs Slot Resmi https://htp.ac.id/ Slot Gacor Slot Gacor Slot Gacor Slot Gacor Slot Gacor Slot Gacor Slot Gacor https://pertanian.hsu.go.id/vendor/ https://onlineradio.jatengprov.go.id/media/ slot 777 Gacor https://www.opdagverden.dk/ https://perpustakaan.unhasa.ac.id/info/ https://perpustakaan.unhasa.ac.id/vendor/ https://www.unhasa.ac.id/demoslt/ https://mariposa.tw/ https://archvizone.com/