क्रिस्पी पकोडे
साहित्य : 3 बटाटे, 250 ग्रॅम सुरण, 100 ग्रॅम पनीर , स्वादानुसार सैंधव व लाल मिरची पूड, पाव कप वरीचं पीठ, थोडं तेल.
चटणीसाठी : 1 कप भाजून जाडसर वाटलेले काजू, 1 कप भाजून जाडसर वाटलेले शेंगदाणे, पाव टीस्पून जिरे,
थोडे कडिपत्ते, 2-3 हिरव्या मिरच्यांची पेस्ट, 100 ग्रॅम ताजं व घट्ट दही, 4-5 टेबलस्पून मध, 1 टेबलस्पून तूप.
कृती : बटाटे, सुरण आणि पनीरचे समान आकाराचे पातळ व लांबट तुकडे करून घ्या. पनीरच्या कापांवर मीठ आणि लाल मिरची पूड भुरभुरून थोड्या वेळासाठी बाजूला ठेवून द्या.
चटणी तयार करण्यासाठी, एका पॅनमध्ये तूप गरम करून, त्यात जिरे आणि कडिपत्त्याची फोडणी करून, आचेवरून खाली उतरवा. आता त्यात काजू व शेंगदाण्याची पूड, हिरवी मिरचीची पेस्ट, दही आणि मध घालून व्यवस्थित फेटून घ्या. थोड्या वेळाने पनीरच्या कापाच्या एका बाजूला बटाट्याचा काप आणि दुसर्या बाजूला सुरणाचा काप ठेवून, त्यावर वरीचं पीठ भुरभुरा आणि व्यवस्थित दाबा. नॉनस्टिक पॅनवर थोडं तेल घालून त्यावर हा पकोडा सोनेरी रंगावर शेकून घ्या. गरमागरम क्रिस्पी पकोडे हॉट अॅण्ड स्वीट चटणीसोबत सर्व्ह करा.