Close

क्रिस्पी पोटॅटो आणि फ्राइड आलू – खसखस (Crispy Potatoes And Fried Potatoes – Khas Khas)

क्रिस्पी पोटॅटो
साहित्य: 250 ग्रॅम बटाटा, 1 टीस्पून कॉर्नफ्लोअर, 1 टीस्पून मैदा, अर्धा टीस्पून पांढरी मिरी पावडर, 1-1 टीस्पून बारीक चिरलेला लसूण आणि आले, अर्धा टीस्पून काळी मिरी पावडर, चवीनुसार मीठ.
ग्रेव्हीसाठी साहित्य: 1-1 टीस्पून बारीक चिरलेला लसूण आणि आले, अर्धा टीस्पून हिरवी मिरची पेस्ट, अर्धा टीस्पून लाल मिरची पेस्ट, 1 टीस्पून कॉर्नफ्लोअर, अर्धा टीस्पून चिली सॉस, 3 टीस्पून सोया सॉस, 1 कप पाणी, मीठ चवीनुसार, तेल.
कृती : बटाटे लांबट कापून घ्या. कॉर्नफ्लोअर, मैदा, पांढरी मिरी पावडर, लसूण, आले, मीठ आणि मिरी पावडर मिक्स करा. पाणी घालून बॅटर तयार करा. या बॅटरमध्ये बटाटे बुडवून गरम तेलात तळून घ्या.
ग्रेव्ही बनवण्याची कृती : कढईत तेल गरम करा. त्यात चिरलेला लसूण, आले, सोया सॉस, चिली सॉस, पाणी, लाल मिरची पेस्ट, हिरवी मिरची पेस्ट आणि कॉर्नफ्लोअर घाला. दोन मिनिटांनी विस्तवावरून उतरवा. तळलेल्या बटाट्यावर घालून सर्व्ह करा.


फ्राइड आलू - खसखस
साहित्य: 6 बटाट्याचे तुकडे, 1 चमचे बारीक चिरलेली कोथिंबीर, 2 चमचे भाजलेली खसखस , 2-3 हिरव्या मिरच्या, 3 सुक्या लाल मिरच्या, अर्धी वाटी पाणी, चवीनुसार सैंधव मीठ, आवश्यकतेनुसार तेल.
कृती: खसखस आणि हिरव्या मिरच्या बारीक करून पेस्ट बनवा. कढईत तेल गरम करून बटाटे तळून घ्या. कढईत थोडे तेल गरम करा. त्यात सुक्या लाल मिरच्या घाला. खसखस पेस्ट घालून मंद आचेवर पाच मिनिटे तळून घ्या. तळलेले बटाटे आणि सैंधव मीठ घाला. थोडे पाणी घालून शिजवा. चिरलेली हिरवी कोथिंबीर घालून सजवून सर्व्ह करा.

Share this article