सारणासाठी साहित्य : 2 वाट्या मूग डाळ, 1 टीस्पून आलं-लसूण पेस्ट, 1 टीस्पून लाल मिरची पावडर, अर्धा टीस्पून काळे तीळ, प्रत्येकी 1 टीस्पून गरम मसाला पावडर, धणे पावडर, जिरे पावडर, अर्धा टीस्पून बडीशेप, चाट मसाला व आमचूर, चिंचेची चटणी, गोड चटणी, दही आणि चवीनुसार मीठ.
पारीसाठी साहित्य : 2 वाट्या मैदा, गरम तेल, मीठ, कोमट पाणी, तळण्यासाठी तेल
कृती : मूग डाळ 4-5 तास भिजवून ठेवा. नंतर पाणी काढून निथळून ठेवा. कढईत तेल गरम करून जिर्याची फोडणी द्या. आलं-लसणाची पेस्ट टाका. काळे तीळ आणि बडीशेप टाका. लाल मिरची पावडर, धणे पावडर, जिरे पावडर, गरम मसाला पावडर टाका. यात मूग डाळ टाकून परतून घ्या. यात मीठ टाकून परतून घ्या. आमचूर आणि चाट मसाला टाका. मंद आचेवर डाळ कोरडी होईपर्यंत परतून घ्या. आता मैद्यामध्ये मीठ, कोमट पाणी व गरम तेल टाकून घट्ट पीठ मळून घ्या. याचे छोटे छोटे गोळे करून यात तयार केलेले सारण भरा. ही कचोरी तळून घ्या. तळलेली कचोरी फोडून यावर चिंचेची चटणी, हिरव्या चटणी, दही टाका. चाट मसाला भुरभुरवा व कोथिंबीर टाकून सर्व्ह करा.
दही कचोरी (Dahi Kachori 1)
Link Copied