Close

डाळ वडा (Dal Vada)

डाळ वडा

साहित्य : 1 कप चणा डाळ, 1 टेबलस्पून आले, 4 हिरव्या मिरच्या, 5-6 लसूण पाकळ्या, अर्धा कप बारीक चिरलेल्या भाज्या (कोबी, कांद्याची पात व बीट एकत्रित), चिमूटभर सोडा, 1 टीस्पून धणे, 1 टीस्पून जिरे, बारीक चिरलेली कोथिंबीर, तळण्यासाठी तेल, चवीनुसार मीठ.

कृती : भिजवलेली चण्याची डाळ उसपून त्यात आले, हिरवी मिरची, मीठ व लसूण घालून भरड वाटून घ्या. यात कोबी, कांद्याची पात, बीट, धणे, जिरे, कोथिंबीर, मीठ व सोडा मिसळून मिश्रण एकजीव करा. तेल गरम करून मध्यम आचेवर कबाब सोनेरी रंगावर तळून घ्या. व्हेजिटेबल कबाब हिरव्या चटणीसह सर्व्ह करा.

Share this article