Close

तळलेले मोदक आणी रंगीत मोदक (Fried Modak And Colourful Modak)

तळलेले मोदक


पारीसाठी साहित्य : दोन कप मैदा, तूप, चिमूटभर मीठ, दूध, पाणी.

सारणासाठी साहित्य : तीन कप ओल्या नारळाचा चव, दोन कप साखर, खसखस-वेलची पूड, दूध.

कृती : मैद्यामध्ये कडक तुपाचे मोहन टाकून दूध व पाणी मिसळून कडक पीठ मळून घ्या. नारळाचा चव, साखर आणि दूध एकत्र करून कोरडे होईपर्यंत शिजवून घ्या. यात वेलची-खसखस पूड घाला. आता मळलेल्या पिठाची पारी लाटून तयार सारण भरून मोदक तयार करून घ्या. मोदक तळून घ्या.

'रंगीत मोदक


पारीसाठी साहित्य : रंगीत मोदक करताना नेहमीप्रमाणे करतो, तशी उकड काढून घ्यावी. मात्र ही उकड नेहमीपेक्षा अर्धा पट जास्त प्रमाणात घ्यावी.

सारणासाठी साहित्य : नेहमीप्रमाणे, त्याच प्रमाणात सारण करून घ्यावे.

कृती : तांदळाची उकड काढताना, उकड काढल्यानंतर प्रथम नेहमीच्या प्रमाणाची उकड बाजूला काढून ठेवावी. आता उरलेल्या उकडीचे तीन गोळे करून प्रत्येक भागात एक-एक रंग मिसळा. आता एका मोदकासाठी घेतो तेवढी उकड घेऊन, रंगीत गोळ्याची छोटीशी गोळी पांढर्‍या गोळ्याला चिकटवा. नेहमीप्रमाणे पारी बनवून सारण भरून मोदक तयार करा. याप्रमाणे तीनही रंग एकत्र वापरून मोदक तयार करता येतात अथवा प्रत्येकी एक रंग वापरूनही मोदक तयार करता येतात. अशा विविधरंगी मोदकांनी गणपतीसमोर सुंदर आरास करता येते.

Share this article