Close

गोश्त कोर्मा (Gosht Corma)

गोश्त कोर्मा
साहित्य : 200 ग्रॅम बोनलेस मटण, 7-8 कांदे, 1 टेबलस्पून शुद्ध तूप, 2-3 वेलची, 2-3 मोठी वेलची, 2-3 तमालपत्र,
1 जायपत्री, 2 टीस्पून धणे पावडर, 1 टीस्पून तिखट लाल मिरची पावडर, 2 टीस्पून लाल मिरचीची पेस्ट, एक वाटी
खवलेले ओले खोबरे., अर्धी वाटी दही, केवडा इसेन्स, तेल आणि चवीनुसार मीठ.
कृती : मटण धुवून त्याला प्रथम हळद, मिरची पावडर, लाल मिरचीची पेस्ट, आलं-लसूण पेस्ट, धणे पावडर, दही आणि मीठ लावून ठेवा. हे मिश्रण लावून किमान एक तास तसेच ठेेवावे. यानंतर सात ते आठ कांदे चिरून सोनेरी रंगावर परतून घ्या. नारळाचा चवही जरासा परतून कांदा व खोबरे एकत्र वाटून त्याची पेस्ट बनवा. उरलेला कांदा उभा अथवा गोल चिरून सोनेरी रंगावर तळून सजावटीसाठी बाजूला ठेवा. आता कढईत तूप गरम करून व तेल गरम करून कांदा-खोबर्‍याची पेस्ट परतून घ्या. यात मटण टाकून झाकण ठेवून शिजवा. शिजवताना आच मंद असावी. थोड्या वेळाने झाकण काढा. मटणाला पाणी सुटू लागले की, थोडेसे गरम पाणी टाकून वाफेवर मटण शिजवून घ्या. मटण शिजल्यानंतर यात केवडा इसेन्स टाका. उभे चिरलेले आले आणि तळलेला कांदा टाकून गोश्त कोर्मा सर्व्ह करा.

Share this article