ग्रीन कूलर
साहित्य : 4 टेबलस्पून खस सिरप, लेमन फ्लेवर सोडा 500 मि.ली., पाव टीस्पून मीठ, पाव टीस्पून काळी मिरी पावडर, एका लिंबाचा रस, बर्फाचे तुकडे, 1 टेबलस्पून सब्जा (पाण्यात भिजवाव्यात).
कृती : खस सिरप आणि लेमन फ्लेवर सोडा एकत्र मिसळा. यात काळी मिरी पावडर, मीठ, लिंबाचा रस मिसळा. बर्फाचे तुकडे घालून हे मिश्रण ब्लेण्ड करा. सब्जा टाकून कूल कूल ग्रीन कूलर सर्व्ह करा.
लिची स्मूदी
साहित्य : 400 मि.ली. लिची ज्यूस, 1 कप व्हॅनिला आइस्क्रीम, 1 कप शहाळ्याचे पाणी, पाव टीस्पून जायफळ पावडर, पाव टीस्पून दालचिनी पावडर, बर्फाचे तुकडे.
कृती : लिची ज्यूसमध्ये व्हॅनिला आइस्क्रीम आणि शहाळ्याचे पाणी मिसळा आणि मिश्रण ब्लेण्ड करा. यात जायफळ पावडर, दालचिनी पावडर मिसळून बर्फाचे तुकडे घाला आणि पुन्हा एकदा ब्लेण्ड करा. थंडगार लिची स्मूदी सर्व्ह करा.