केशरी मोदक
पारीसाठी साहित्य : उकड बनविण्याचे साहित्य. या मोदकांसाठी अर्धा कप दुधात केशराच्या काड्या घालून हे दूध उकड काढताना पाण्यात घालावे.
सारणासाठी साहित्य : दोन कप नारळाचा चव, एक कप साखर, अर्धा कप खवा, दोन टेबलस्पून पिठीसाखर, ड्रायफ्रुट पावडर.
कृती : थोडेसे तूप टाकून नारळाचा चव परतून घ्या. इतर साहित्य टाकून सारण तयार करा. हे तयार केलेले सारण भरून मोदक तयार करा. केशरी पिवळ्या रंगाचे हे मोदक सुंदर दिसतात.
नारळाच्या दुधातले मोदक
या पाककृतीत सारण उकडीच्या मोदकाप्रमाणेच राहील. मात्र उकड काढताना पुढीलप्रमाणे साहित्य घेऊन काढावी.
पारीसाठी साहित्य : एक कप तांदळाचे पीठ, एक कप पाणी, अर्धा कप नारळाचे दूध, एक चमचा साखर, पाव चमचा मीठ, दोन चमचे लोणी, चिमूटभर मीठ.
कृती : एका नारळाचा चव घेऊन त्यात थोडं गरम पाणी घाला. याचे अर्धा कप घट्ट दूध काढा व उकडीसाठी वापरा. नेहमीप्रमाणे उकड काढून मोदक बनवा. पारीमध्ये नारळाचे दूध वापरल्याने हे मोदक मधुर चवीचे होतात.