खांडवी
साहित्य : 3 वाट्या बाजरीचा लापशी रवा (अगदी बारीक असायला हवा), साडे तीन वाट्या पाणी, 3 वाट्या गूळ, 2 चमचे तूप, 2 चमचे खसखस, अर्धा वाटी ओले खोबरे, अर्धा चमचा जायफळ पूड, चवीनुसार मीठ.
कृती : कढईत तूप घालून रवा भाजून घ्या. दुसर्या आचेवर पाण्यात गूळ घालून गरम करत ठेवा. गूळ विरघळून पाण्याला उकळी आली की, ते पाणी भाजलेल्या रव्यामध्ये घाला, म्हणजे रवा चांगला फुलेल. थोडे एकत्र करून त्यावर झाकण लावून 1-2 वाफा काढा. रवा पूर्ण शिजला व घट्ट झाला की त्यात जायफळ पूड व चवीनुसार मीठ घालून एकत्र करा. ट्रे किंवा ताटाला तुपाचा हात लावून, त्यात हे मिश्रण गरम असतानाच ओता. सगळीकडून सारखे थापून घ्या. त्यावर ओले खोबरे व खसखस घालून थोडे दाबून घ्या. मिश्रण गार झाल्यावर त्याच्या वड्या पाडा.