Close

कोकम सरबत आणि कलिंगडाचं सरबत (पारशी पद्धतीचं) (Kokum Syrup And Watermelon Syrup (Parsi Style)

कोकम सरबत
साहित्य : अर्धा किलो कोकमाची फळं, 1 किलो साखर.
कृती : कोकमाची पिकलेली फळं घेऊन, त्याचे चिरून समान दोन भाग करा. ते वाटीच्या आकाराचे होतील. त्यातील बिया काढून, त्यात साखर भरा. एका काचेच्या बरणीत साखर भरलेल्या कोकमाच्या वाट्या साखर सांडणार नाही अशा प्रकारे भरा. त्यावर उर्वरित साखर व्यवस्थित पसरवा. ही कोकमाची बरणी दोन
ते तीन दिवस थेट उन्हात न ठेवता, तशीच बाहेर ठेवा. दोन-तीन दिवसांनी फळाला चांगला रस सुटतो.
सरबत बनवण्यासाठी : पाऊण ग्लास पाण्यामध्ये आवश्यकतेनुसार कोकमाचं सरबत आणि चवीनुसार मीठ घालून व्यवस्थित एकत्र करा. हे मिश्रण गाळून सर्व्ह करा.

कलिंगडाचं सरबत (पारशी पद्धतीचं)
साहित्य : 1 कलिंगड, अर्धा लीटर दूध, 100 ग्रॅम साखर, थोड्या लाल गुलाबाच्या पाकळ्या, गुलाबपाणी.
कृती : कलिंगड एक ते दोन तास पाण्यात ठेवा. नंतर चिरून सालं, बिया काढून टाका. लाल गुलाबाच्या पाकळ्या अर्धा तास पाण्यात भिजत ठेवा. नंतर कलिंगडासोबत मिक्सरमधून बारीक करून घ्या. हा गर तीन-चार तास फ्रीजमध्ये ठेवा. आयत्या वेळी त्यात दूध आणि गुलाबपाणी घालून पिण्यास द्या.
कलिंगडाचं शाही सरबत बनवण्यासाठी : कलिंगडाचे स्कूपरने लहान-लहान स्कूप काढून, एक-दोन तास फ्रीजमध्ये ठेवा. एका ग्लासमध्ये सर्वप्रथम बर्फाचा चुरा आणि गुलाबपाणी घाला. त्यावर कलिंगडाचे स्कूप घालून, वरून कलिंगडाचा
रस घाला.

Share this article