Close

लक्ष्मीच्या पावलांनी मालिकेच्या चाहत्यांना धक्का, नवीन सरोजची एण्ट्री (Lakshmichya Pavalani New Entry Of Saroj)

अल्पावधीतच लोकप्रियतेच्या शिखरावर चढलेली मालिका लक्ष्मीच्या पावलांनी मध्ये मोठा बदल झाला आहे. या मालिकेला गेल्या काही दिवसात बऱ्याच कलाकारांनी निरोप दिला त्यामुळे त्यांच्या जागी नव्या कलाकारांची वर्णी लागली आता आणखी एका महत्त्वाची भूमिका साकारणाऱ्या अभिनेत्रीने मालिकेला निरोप दिला असून तिच्या जागी नवीन अभिनेत्री आली आहे.

लक्ष्मीच्या पावलांनी या मालिकेत कलाला सतत पाण्यात पाहणारी तिची सासू सरोज हिने मालिकेला निरोगी आहे. तिच्या जागी आता नवीन अभिनेत्री आल्याचे पाहायला मिळते. आज मालिकेच्या अंती दाखवल्या जाणाऱ्या प्रोमो मध्ये नवीन सरोज आल्याचे दिसत आहे. अभिनेत्री पल्लवी पटवर्धन ही आता सरोजचे पात्र साकारणार आहे.

आतापर्यंत ही भूमिका अभिनेत्री मंजुषा गोडसे यांनी साकारलेली. त्यांच्यातली हळवी आई आणि करारी व खाष्ट सासू प्रेक्षकांना आवडायची. मंजुषा यांनी या मालिकेत खलभूमिका साकारली असली तरीही त्यांच्या व्यक्तिरेखेला प्रेक्षकांचे खूप प्रेम मिळाले. पण आता अचानक हा नवा बदल समोर आल्यामुळे प्रेक्षकांच्या प्रतिक्रिया काय येणार हे पाहणे उत्सुकतेच ठरणार आहे.

Share this article