लेमन शेवया
साहित्य : 2 कप गव्हाच्या शेवया, 1 कांदा, 2 हिरव्या मिरच्या आणि आल्याचा एक तुकडा (बारीक कापून घ्या), थोडा कढिपत्ता, 1 टीस्पून राई, अर्धा टीस्पून हळद, अर्धा कप शेंगदाणे (तळून घ्या), 2 टेबलस्पून लिंबाचा रस, 2 टेबलस्पून तेल, थोडी चिरलेली कोथिंबीर
कृती : एका पॅनमध्ये गरजेप्रमाणे पाणी घेऊन त्यात 2 टीस्पून तेल, हळद आणि मीठ घालून गरम करा. पाण्याला उकळी आली की त्यात शेवया घाला. शेवया मऊ झाल्या की आचेवरून खाली उतरून त्यातील पाणी काढून टाका. आता पॅनमध्ये तेल गरम करून राई आणि कढिपत्त्याची फोडणी द्या. त्यात कांदा आणि आलं घालून व्यवस्थित परतून घ्या. शेवटी त्यात शिजवून घेतलेल्या शेवया आणि लिंबाचा रस घालून चांगलं मिक्स करून घ्या. नंतर त्यात तळलेले शेंगदाणे घाला. 1-2 मिनिटं शिजवा आणि गरमगरम सर्व्ह करा.