Close

लिची श्रीखंड (Litchi Shrikhand)

लिची श्रीखंड


साहित्य : 1 वाटी चक्का, अर्धी वाटी साखर, 4 लिची, वेलची पूड, केशर.
सजावटीसाठी : बदाम, लिची, केशर.
कृती : चक्का व साखर एकत्र करा. हे मिश्रण व्यवस्थित फेटून घ्या. फेटून झाल्यावर यात वेलची पूड, केशर, लिचीचे बारीक केलेले तुकडे घाला व ते चांगले एकजीव करा. तयार झालेल्या श्रीखंडावर बदाम, केशर व लिची टाकून सजवा आणि सर्व्ह करा.
टिप : सीझनप्रमाणे यामध्ये इतर कोणतीही फळे घालून चविष्ट श्रीखंड तयार करता येते.

Share this article