Close

अवधूत गुप्तेला मातृशोक, मुंबईच्या रुग्णालयात अखेरचा श्वास ( Marathi Singer Composer Avdhoot Gupte Mother Passes Away)

मराठी संगीतसृष्टीतून एक दु:खद बातमी समोर येत आहे. लोकप्रिय गायक व संगीतकार अवधूत गुप्तेला मातृशोक झाला आहे. अवधूतची आई मृदगंधा गुप्ते या काही दिवसांपासून रुग्णालयात दाखल होत्या. त्यांच्यावर उपचार सुरू होते. मुंबईतील व्होकार्ट रुग्णालयात अवधूत गुप्तेच्या आई मृदगंधा यांच्यावर उपचार सुरू होते. पण त्यांच्या उपचाराला यश आले नाही. आज अंत्यदर्शनानंतर दौलतनंगर बोरिवली ईस्ट येथे त्यांच्यावर अंतिमसंस्कार करण्यात येतील.

अवधूत गुप्ते १९९६ मध्ये आलेल्या सा रे ग म प हिंदी या रियालिटी शोमध्ये स्पर्धक म्हणून सहभाग घेतला होता . विशेष म्हणजे अवधूतच त्या सीझनचा विजेता ठरला. त्यानंतर गायन याच क्षेत्रात अवधूत ने आपले करिअर करण्याचे ठरवले आणि मग एकापाठोपाठ एक अशी हिट गाणी त्याने इंडस्ट्रीला दिली. अवधूत गुप्तेचं ऐका दाजीबा हे सुपरहिट गाणं आजही चाहते गुणगुणत असतात. या गाण्यामुळे अवधूतला खरी ओळख मिळाली होती. नुकतीच या गाण्याला २१ वर्ष पूर्ण झाली.

गायन क्षेत्रात जम बसवल्यावर अवधूतने दिग्दर्शन क्षेत्रातही आपला मोर्चा वळवला .  २०१० मध्ये त्याने पहिल्यांदा झेंडा हा सिनेमा दिग्दर्शक केला होता. त्यानंतर अवधूत ने मोरया हा सिनेमा दिग्दर्शित केला.

याशिवाय अवधूतने अनेक रियालिटी शोमध्ये परीक्षाकाची भूमिकाही पार पाडली आहे.  त्याचा खूप्ते तिथे गुप्ते हा शो नेहमीच चर्चेत असतो. यावेळी या शोचा ३ सीजन येऊन गेला.

Share this article

https://www.perkemi.org/ Slot Gacor Slot Gacor Slot Gacor Slot Gacor Situs Slot Resmi https://htp.ac.id/ Slot Gacor Slot Gacor Slot Gacor Slot Gacor Slot Gacor Slot Gacor Slot Gacor https://pertanian.hsu.go.id/vendor/ https://onlineradio.jatengprov.go.id/media/ slot 777 Gacor https://www.opdagverden.dk/ https://perpustakaan.unhasa.ac.id/info/ https://perpustakaan.unhasa.ac.id/vendor/ https://www.unhasa.ac.id/demoslt/ https://mariposa.tw/ https://archvizone.com/