मसाला डोसा
साहित्य : 3 कप तांदूळ, 1 कप उडीद डाळ, तेल आणि चवीनुसार मीठ.
कृती : तांदूळ आणि उडीद डाळ 5-6 तास पाण्यात भिजत ठेवा. यानंतर यातील पाणी निथळून वाटून घ्या. हे मिश्रण आंबवण्याकरिता 8 तास ठेवा. यात मीठ टाकून ढवळून घ्या. गरम तव्याला थोडेसे तेल लावून डोशाचे मिश्रण तव्यावर पसरवा. सांबार आणि चटणीसह डोसा सर्व्ह करा.
इडली सांबर
साहित्य : दोन कप तांदूळ, एक कप उडीद डाळ, चवीनुसार मीठ.
कृती : तांदूळ आणि उडीद डाळ वेगवेगळे धुवून पाच-सहा तास भिजत ठेवा. नंतर तांदूळ आणि उडीद डाळ एकत्र वाटून रात्रभर आंबवण्यासाठी ठेवा. मिश्रण अगदी घट्ट झाल्यास, त्यात अर्धा कप पाणी टाका. मीठ टाकून मिश्रण ढवळून घ्या. आता इडलीच्या साच्याला तेल लावून त्यात पळीने इडलीचे मिश्रण ओता. 15-20 मिनिटे वाफ येऊ द्या. इडली साच्यातून काढून थंड होण्यास ठेवा. गरम गरम सांबर आणि हिरव्या चटणीसह सर्व्ह करा.