साहित्य : 2 अंडी, 1 कांदा, 2 हिरव्या मिरच्या, 1 टोमॅटो, 1 टीस्पून बारीक कापलेली हिरवी मिरची, प्रत्येकी 1 टेबलस्पून कोथिंबीर सिमला मिरची व किसलेले गाजर, तेल आणि चवीनुसार मीठ.
कृती : अंड्यामध्ये मीठ व मिरची मिसळा. पसरट तव्यावर तेल गरम करून यावर अंडे ओता. यावर लगेच कापलेला कांदा, टोमॅटो, सिमला मिरची, गाजर व कोथिंबीर पसरवा. गरम गरम मसाला ऑम्लेट पावासह सर्व्ह करा.
Link Copied