मोतीचूर लाडू
साहित्य : 500 ग्रॅम साखर, 250 ग्रॅम बेसन, 250 ग्रॅम साजूक तूप, प्रत्येकी 50 ग्रॅम पिस्ता व बदाम (तुकडे करून), थोडी वेलची पूड व केशर.
कृती : साखरेचा पाक तयार करून बाजूला ठेवून द्या. पाणी घालून बेसनाचे मिश्रण तयार करा. कढईमध्ये तूप गरम करा. कढईतील गरम तुपावर झारा धरून त्यावर बेसनाचे मिश्रण हळूहळू ओता आणि बुंदी
तळून घ्या. आता ही तळलेली बुंदी, बदाम-पिस्त्याचे तुकडे, वेलची पूड व केशर साखरेच्या पाकात
घालून व्यवस्थित एकत्र करा. मिश्रण थंड झाल्यावर त्याचे लाडू वळा.
Link Copied