Close

पाणी पुरी (Pani Puri)

साहित्य : पाणीपुरीच्या पुरीचे 1 पाकीट, पुदिन्याची एक जुडी, थोडीशी कोथिंबीर, 5-6 मिरच्या, चाट मसाला, काळे मीठ, 2 टीस्पून जिरे पावडर, 2 टीस्पून धणे पावडर, 2 टीस्पून चाट मसाला, 2 टीस्पून आमचूर, 2 वाट्या उकडून कुस्करलेला बटाटा, 1 टीस्पून लाल मिरची पावडर, एक वाटी चिंचेची चटणी, एक वाटी हिरवी चटणी, 2 वाट्या भिजवलेले सफेद वाटाणे, आलं-लसूण पेस्ट.
कृती : पाणीपुरीचे पाणी बनविण्यासाठी प्रथम मिरची, कोथिंबीर, पुदीना एकत्र वाटून घ्या. यात योग्य प्रमाणात पाणी घेऊन चाट मसाला, जिरे पावडर, धणे पावडर, आमचूर, काळी मिरी पावडर, मीठ आणि काळे मीठ टाका. हे पाणी चांगले ढवळून घ्या. पाणीपुरी देताना या पाण्यात चवीनुसार हिरवी चटणी अथवा गोड चटणी घालू शकता. आता पाणीपुरीचा रगडा बनविण्यासाठी प्रथम वाटाणे कुकरमध्ये मऊ शिजवून घ्या. कढईत तेल गरम करून यात आलं-लसणाची पेस्ट व हिंग टाकून परतून घ्या. जिरे पावडर आणि धणे पावडर टाका. वाटाणे टाकून परतून घ्या व वरून हळद आणि मीठ टाका. बटाट्यामध्ये मीठ आणि चाट मसाला मिसळून बाजूला ठेवा. पाणीपुरीसाठी बटाटे उकडताना त्यात हळद टाकल्यास हा रगडा चविष्ट लागतो व छान दिसतो. सर्व्ह करताना पुरीमध्ये बटाट्याचे मिश्रण, वाटाण्याचा रगडा, चिंचेची चटणी व तिखट चटणी टाका. सोबत पाणीपुरीचे पाणी देऊन सर्व्ह करा.

Share this article