Close

पापड रोल आणि चॉकलेट बटाटा बर्फी (Papad Roll And Chocolate Potato Barfi)

पापड रोल
साहित्य: 2 मोठे पापड, 2 उकडलेले बटाटे, 20 ग्रॅम उकडलेले हिरवे वाटाणे, 5 ग्रॅम जिरे, 1 टीस्पून लाल तिखट, अर्धा चमचा हळद, अर्धा चमचा आमचूर पावडर , अर्धा चमचा शाही गरम मसाला पावडर, 20 ग्रॅम बारीक चिरलेली कोथिंबीर, 20 ग्रॅम बेसन, चवीनुसार मीठ.
कृती : बटाटे मॅश करा. कढईत जिरे फोडणी देऊन त्यात बटाटे व वाटाणे टाकून लाल तिखट, हळद, आमचूर पावडर, गरम मसाला, कोथिंबीर आणि मीठ घालून हलके परतून घ्या. आता पापडात बेसनाचे बॅटर लावून त्यात तयार मसाला भरा. पापडाचा रोल बनवा, बेसनाच्या पिठात पापडाच्या कडा बंद करून तळून घ्या. गरमागरम सर्व्ह करा.

चॉकलेट बटाटा बर्फी
साहित्य: 4 उकडलेले बटाटे, 2 चमचे ड्रिंकिंग चॉकलेट, अर्धा कप साखर, 2 चमचे तूप, अक्रोड, बदाम, काजूचे तुकडे.
कृती : बटाटे उकडून किसून घ्या. कढईत तूप गरम करून बटाटे चांगले परतून घ्या. त्यात साखर घाला आणि
20-25 मिनिटे सतत ढवळत राहा. बर्फी तयार झाल्यावर त्यात ड्रिंकिंग चॉकलेट टाका. ड्रायफ्रुट्स मिक्स करा आणि पाच मिनिटे ढवळल्यानंतर ग्रीस केलेल्या डिशमध्ये घाला. चांदीचा वर्ख आणि ड्रायफ्रूटच्या तुकड्यांनी सजवा आणि आवडत्या आकारात कापून घ्या.

Share this article