साहित्य: 2 कप उकडलेले आणि मॅश केलेले बटाटे, चवीनुसार मीठ, अर्धा कप ब्रेड क्रम्स सारणासाठी: 1 कप उकडलेले आणि मॅश केलेले हिरवे वाटाणे, 1/4 कप बारीक चिरलेला पुदिना, 1/4 कप बारीक चिरलेली कोथिंबीर, 1 बारीक चिरलेली हिरवी मिरची, लिंबाचा रस, साखर आणि चवीनुसार मीठ. कृती: उकडलेल्या बटाट्यात मीठ घालून चांगले मॅश करा. त्याचे 4 समान भाग करा. स्टफिंगचे सर्व साहित्य एकत्र करा आणि 4 समान भाग करा. गोल पॅटीस करा. बटाट्याच्या छोट्या पुर्याय करून त्यात पॅटीसचे मिश्रण भरा. ब्रेड क्रम्समध्ये चांगले घोळवा. कढईत तेल गरम करून पॅटीस मंद आचेवर गोल्डन ब्राऊन होईपर्यंत तळा. गरमागरम मटार पॅटीस लेमन हनी टीसोबत सर्व्ह करा.
Link Copied